Tuesday, September 3, 2019

घुमो फिरो और एन्जॉय करो

मस्त फिरा व एन्जॉय करा

खरंच सांगायचं तर या विषयावर पुष्कळ ब्लॉग्स आहेत. तरीपण आपण(स्वतःला आपण म्हणाव इतका पण मोठा नाही मी..) काहीतरी लिहावं अशी मनापासून इच्छा झाली म्हणून हा लिखाणाचा खटाटोप.

फिरण्याबद्दल लिहिताना अमुक एका ठिकाणी जा असं काही सांगणं म्हणजे जे आपल्याला आवडतं तेच इतरांना पण आवडाव अशी अपेक्षा करण्यासारख आहे. फिरायला कुठेही जा .आपण का फिरायला जातोय ते महत्त्वाचे.
आता तुम्ही म्हणाल की हा काय प्रश्न आहे? पण एकदा विचार तर करून पहा मगच तुम्हाला कळेल आपण फिरायला का जातो अथवा फिरायला जाऊया असा विचार का करतो?
माझ्याबद्दल सांगायचं तर मला फिरायला आवडतं. आता ते का ते मी पुढे सांगेनच , पण नॉर्मली का जायला पाहिजे त्याविषयी थोडेसे पाहूया तसेच पर्यटनाचे ढोबळ प्रकार सुद्धा पाहूयात.

धार्मिक पर्यटन :भारतामधे सर्वात लोकप्रिय असलेला हा प्रकार आहे. मुळातच आपण भारतीय श्रद्धाळु आणि रीतिरिवाज नीट पाळणारे, सर्व धर्म,जाती याला अपवाद नाहीत. प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्टदेवतेला भेट देण्यास जातच असते.
विकेंड पर्यटन :बऱ्याच नोकरी करणाऱ्या लोकांना आजकाल शनि-रवि सुट्टी असते. आपल्या जवळपासची ठिकाणे यामध्ये फिरण्याकडे कल आढळतो. तरूणाईमध्ये अतिशय लोकप्रिय प्रकार.
ब्रेक: बरीच लोक वर्षातून एकदा आपल्या रोजच्या जीवनातुन विरंगुळा म्हणून पर्यटनाला जातात. यामध्ये प्रसिद्ध ठिकाणे पाहण्याकडे कल आढळतो.

आता मी एक प्रश्न विचारेल ..तुमची सर्वात जास्त आवडणार फिरण्याचं ठिकाण कोणतं ?
नीट विचार करून ठेवा.
. .
...
...
तुम्ही "क्ष" हे नाव पक्क मनात ठरवलं असं समजूया. जर नसेल माहित तर सोडून द्या, नो टेन्शन.

आता आपण नेहमी वेगळ्या ठिकाणी का जातो ते पाहूया. बरेचदा आपणास असे वाटते आणि जे स्वाभाविक पण आहे की मी अमुक ठिकाणी एकदा भेट देऊन आलेलो आहे, आत्ता नवीन ठिकाणी जाऊया मग आणि छान वाटेल .पण जर नीट विचार केला तर असं काही असायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला समजा "क्ष" हे ठिकाण आवडत असेल तर तुम्ही तिथे खूप वेळा सुद्धा नक्की जाणार. प्रत्येक वेळेला नविन आठवणी नविन अनुभव मिळत जाणार. प्रत्येक ठिकाण वेगळया ऋतुमध्ये अनुभवण्याची मजा पण वेगळीच असते.
मला फिरायला का आवडत याच उत्तर पण यातच दडलंय ..समजा मी "क्ष" या ठिकाणी ५ वेळा जाऊन आलो..तरी मी सहाव्यांदा पुन्हा वाटलं तर नक्की जाणार. मला जे आवडतं ते मला करायला आवडतं. आपल्याला जे आवडते ते करण्यातच सर्वाधिक आनंद मिळतो.

माझं "क्ष" ठिकाण तर मला माहित आहे. कोणतं?  ते आपण पाहूया पुढील भागात...
तोपर्यंत तुम्ही पण तुमचं "क्ष" ठिकाण करा नक्की (कोणतं ते महत्वाच नाही,तिथे जाणं महत्वाचे.)
चला तर मग उचला बॅग आणि चला प्रवासाला!!!













Wednesday, September 29, 2010

मनी वसे ते ब्लॉगमध्ये दिसे.

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे असं साक्षात समर्थांनी सांगितल आहे. आपणही काही लिहावं म्हणून हा लेखन उद्योग.